घोडझरी तलावात बुडालेल्या चार युवकांचा मृतदेह मिळाला  The bodies of four youths who drowned in Ghodzari lake were found

▫️शेगावात दुःखाचे वातावरण( An atmosphere of sadness in Shegaon)

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.17 जुलै) :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात रविवारला दुपारी तीन  वाजता च्या दरम्यान चार युवक तलावात मोबाईलवर सेल्फी काढत असतांनाच एक युवक पाय घसरून पडला, त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी तिन मित्रांनी तलावात उडी घेतली. त्यात या चारही युवकांचा बुडुन मृत्यू झाल्याची व्हदयदाय घटना घडली.क्षणात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.

नागभीड पोलीसांना याघटनेची माहिती देण्यात आली. लगेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.पण सायंकाळ झाल्याने त्यांच्या मृतदेहाचा थांगपत्ता लागला नाही.चंद्रपूर जिल्हा अधिकारी यांना या घटनेची माहिती देण्यात आली.त्यांनी लगेच आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण चमुला रविवारलाच रात्री घोडाझरी येथे पाठविले.या चमुने सोमवारी सकाळी ६ वाजता पासून आपली शोध मोहीम सुरू केली.

तब्बल चार तासांनी संकेत प्रशांत मोडक (२२) या युवकाचा मृतदेह सापडला.त्यानंतर चेतन भिमराव मांदाळे (१७) हा सुद्धा हाताला लागला.काही तासांनी धीरज गजानन झाडे(२७) हा सापडला.तर शेवटी मनिष भरत श्रीरामे (३०)  हा युवक सर्वात शेवटी सापडला.ही शोधमोहीम दुपारी ३वाजता पर्यंत चालली हे चारही मृतदेह  नागभीड येथिल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले व त्यांनचे शवविच्छेदन करण्यात आले.

त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले.तब्बल ९ तास तलावात शोधकार्य सुरु होते.नागभीड पोलिस यांनी अखेर सर्व युवकांचे मृतदेह मिळविण्यात करिता अथक परिश्रम घेऊन मृतदेह प्राप्त केले . तर याची उत्तरणीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालयात नागभिड येथे दाखल करून अधिक तपास करून सर्व मृतदेह कुटुंबीयांना स्वाधीन करण्यात येईल अशी माहिती प्राप्त झाली .

       याची सर्व माहिती शेगाव वासियांना मिळताच गावात तसेच परिसरात हंबरडा सुरू असून गावात सर्वत्र शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यांच्या मृतदेहावर शेगाव येथील स्मशान भूमी येथे रात्री अंतिम संस्कार करण्यात येईल..