✒️बाळू रामटेके घोडपेठ(Ghodpeth प्रतिनिधी)
घोडपेठ (दि.7 जुलै) :- भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा चालबर्डी रस्त्यावर असलेल्या चिंतामण रामटेके यांच्या शेतातील महावितरणचा विद्युत खांब झुकलेल्या अवस्थेत असून खांब पडून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खांबाच्या दुरूस्तीबाबत महावितरणला अनेकदा सुचना केलेली आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
तालुक्यातील चिंतामण रामटेके यांची घोटनिंबाळा येथे शेती आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतात धान पिकाची तयारी सुरू आहे. यामुळे सध्या शेतात मजूर व स्त्रियांचे वावरणे सुरू असते. या शेतात असलेला महावितरणचा खांब अतिशय धोकादायक अवस्थेत असून कधीही पडून मोठे नुकसान होवू शकते.
याबाबत शेतकरी चिंतामण रामटेके यांचे पुत्र बाळू रामटेके यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार सुचना दिली. मात्र अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. धोकादायक असलेल्या खांबाची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी बाळू रामटेके यांनी केली आहे. अन्यथा होणाऱ्या दुर्घटनेस सर्वस्वी महावितरणचे अधिकारी जबाबदार राहतील