✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.11 जुलै) :- वरोरा शहरातील वसाहतीमध्ये मागील काही महिन्यापासून वन्य प्राण्यांनी शिरकाव केल्याचे दिसून येत असताना वरोरा शहरातील टिळक प्रभागांमध्ये एका घरात मोराने प्रवेश केला त्या कुटुंबाची चांगलीच खडबड उडाली अखेर समाजसेवी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी घर गाठून मोरा स ताब्यात घेतले व वन विभागाच्या स्वाधीन केले
काही महिन्यापूर्वी वरोरा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात नीलगाय आली होती ती रेल्वे स्टेशन ओलांडून मालवीय प्रभाग वोल्टास सागर कॉलनी व ती मोहबाळागावाकडे गेली होती याच परिसरात मानवी वसाहती मध्ये रानडुकराने हल्ला करून एका ही इसमास जखमी केल्याची घटना घडली होती त्यातच रत्नमाला चौक परिसरात असलेल्या वसाहतीमध्ये माकडांनी हौदहघातल्याने नागरिक वैतागले होते अशातच आता मोराने चक्क टिळक प्रभागातील इस्माईल शेख यांच्या घरात प्रवेश केला .
मोराचा प्रवेश होताच कुटुंबीय हादरून गेले ही माहिती 24 तास सेवा ग्रुपचे अध्यक्ष लखन केशवानी व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळतात त्यांनी मोर असलेल्या घरी जाऊन मोरास ताब्यात घेतले व वनविभागाचे राऊंड ऑफिसर खोब्रागडे यांच्या ताब्यात दिले मोर जखमी असल्याने त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करून त्याला त्याच्या अधिवासात सोडणार असल्याची माहिती वन विभागाने दिली