ग्रामीण भागातील अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद तर अनेक शेत जमीन पाण्याखाली

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू(दि.24 जुलै) :- 

वरोरा व भद्रावती तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग लगातार बंद पडली असून ठिकठिकाणी वाहतूक ठप्प पडलेली आहे, तालुक्यातील चंदनखेडा,आष्टा, कडे जाणार रस्त्यावरून ठिकठिकाणी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे भद्रावती चंदनखेडा,शेगाव,चिमुर मार्ग बंद त्याचप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या कपास ,तूर ,सोयाबीन पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, वरोरा तालुक्यातील परिसरातील चारगाव मध्यम प्रकल्प धरणाच्या महापुरामुळे येथील परिसरातील नाले, नहर ओवर फ्लो भरून वाहत असून हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली आली असून शेतात असलेल्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले अतिवृष्टी पाण्यामुळे बहुतांशी गावचे संपर्क तुटलेल्या असून ठीक ठिकाणी असलेल्या पुलाच्या कमी उंचीमुळे अनेक गावांच्या संपर्क तुटला यामध्ये अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, किनाळा, धानोली,दादापूर, सोनेगाव आष्टा, वडाळा ,घोसरी, मानोरा, वायगाव, चारगाव आदी गावांच्या वाहतूक संपर्क तुटलेले आहे.

वारंवार शासनाला अर्जुनी गावाच्या नागरिकांनी फुलांची उंची वाढवण्याचे मागणी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये होणाऱ्या अतिवृष्टी पावसामुळे अनेक रुग्णांना औषधी उपचारा अभावी गावातच राहावे लागत आहे.

मागील अनेक दिवसांपासून गावात साथीच्याआजाराने जनता त्रस्त असुन नागरिकांना वरोरा,शेगाव या ठिकाणी दळणवळण,दवाखाना, शिक्षण इतर कामासाठी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणातअडचणी निर्माण होत असून एखादी व्यक्ती मृत्यू पावलेल्या नागरिकांचे प्रेत आणण्याकरिता सुद्धा नागरिकांना अडचणी निर्माण होत असून फुलांची उंची वाढण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.