✒️नागपूर(Nagpur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
नागपूर (दि .20 जानेवारी) :- अमृत भवन, आंध्र असोसिएशन परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग, झांशी राणी चौकाजवळ, नागपूर येथे आयोजित ग्रामायण प्रतिष्ठानच्या ६व्या ग्रामायण उद्यम प्रदर्शनाचा समारोप सोमवारी २० जानेवारी सायंकाळी ४ वाजता होत आहे.
प्रमुख अतिथी म्हणून कुटुंब प्रबोधन गतिविधी, रा.स्व. संघाचे अ.भा प्रमुख रवीजी जोशी, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता व कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी.सी. भरतिया, प्रिन्सिपल चीफ कन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट श्रीमती शोमिता बिश्वास यांची उपस्थिती राहील.
या समारोपीय सोहळ्यादरम्यान अर्धशतकाहून अधिक काळ सहजीवनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या दाम्पत्यांचा ३५ सुवर्ण महोत्सवी सत्कार होणार आहे. पिढीजात व्यवसाय टिकवून ठेवण्याऱ्या आणि पारंपरिक उद्योग करणाऱ्या ५ कुटुंबांचा गौरव, एक महिला व एक पुरुष अशा दोन सेवाव्रतींचा सामाजिक योगदानाबद्दल ग्रामायण ज्येष्ठ समाजयोद्धा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.