ग्रामपंचायत पळसगांव येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी) 

चिमूर(दि .16 ऑगस्ट) :- ग्रामपंचायत सरपंच श्रीमंत सरिता ताई गुरनूले यांच्या शुभहस्ते आज १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय पळसगांव येथे ध्वजारोहण संपन्न झाला.त्यावेळी देशप्रेमाने प्रेरीत होऊन,बलशाली भारत देशाचा अभिमान बाळगत,भारत मातेचा जयजयकार करूण आपण हा दिवस आनंदिने साजरा करूया.योग्य नेतृत्वामुळे देशाचे भविष्य आणखी उज्वल होईल,असा विश्वास व्यक्त करीत ग्रामपंचायत चे सरपंच श्रीमंत सरिता ताई गुरनूले यांनी स्वातंत्र दिनाच्या पळसगांव येतील समस्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ग्रामपंचायत चे उपसरपंच तुलसीदास शेरकुरे ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गजभिये ग्रामपंचायत सदस्य हपिज शेख शिवानी विद्यालय पळसगांव मुखध्यापक श्रि.चुनारकर सर व शिक्षक आश्रम शाळा मुखध्यापक वरभे सर व शिक्षक वन समिती चे अध्यक्ष दुमदेव बोरकर वन समिती चे माजी अध्यक्ष प्रभाकर गजभिये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश ढोक सचिव सदाशिव जुमनाके सदस्य होमराज आत्राम अंगणवाडी कर्मचारी रामकला पाटिल संघमित्रा खोब्रागडे प्रियंका गोरडवार शिला मोहुर्ले चौधरी शेदरे मॅडम मॅडम काँग्रेस कार्यकर्ता शुभम गजभिये पळसगांव शकाराम गुरनुले महादेव पाटिल हर्षल रामटेके काँग्रेस कार्यकर्ता पळसगांव जानिक बन्सोड वसंता बन्सोड माजी सरपंच छत्रपाल मसराम व गावकरी मंडळी उपस्थित होते.