✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चिमूर(दि.23 फेब्रुवारी) :- ग्रामगीता महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना, चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22 फेब्रुवारी 2024 रोज गुरुवारला लोकनृत्योत्सव 2024 चे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. भीष्मराज सोरते, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन, चिमूर यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. अमीर धम्मानी प्राचार्य, ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर उपस्थित होते. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रा. हुमेश्वर आनंदे, प्रा. संदीप सातव, प्रा. अरुण पिसे, प्रा. नागेश ढोरे व प्रा. समीर भेलावे उपस्थित होते. लोकनृत्योत्सव 2024 मध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातून 18 संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्री. गोविंदराव मुनघाटे कॉलेज कुरखेडा, द्वितीय क्रमांक आशिष मोहरकर कॉलेज भिसी, तृतीय क्रमांक सरदार पटेल कॉलेज चंद्रपूर, चतुर्थ क्रमांक आठवले समाजकार्य कॉलेज चिमूर, प्रोत्साहनपर बक्षीस राष्ट्रपिता महात्मा गांधी सावली यांनी मिळवला. तसेच उत्कृष्ट नृत्यांगन पुरस्काराचा मानकरी कु. आशिष कुमले व उत्कृष्ट नृत्यांगना कु. नंदिनी बोधनवार यांना मिळाला. कार्यक्रम माननीय डॉ. अमीर धमानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. नागेश ढोरे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी सचिन भरडे, जयराम वावरे, अकीब शेख, सूरज शेख यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. समीर भेलावे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व आजी व माजी विद्यार्थी तसेच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते व मोलाचे सहकार्य केले.