ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे मतदान जनजागृती कार्यक्रम

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी) 

चिमूर(दि.16 ऑगस्ट) :- ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 12 ऑगस्ट 2024, सोमवारला मतदान जनजागृती आणि नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. तहसील कार्यालय चिमूर यांच्या सहकार्याने, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि समान संधी केंद्र यांच्या संयुक्त वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. हुमेश्वर आनंदे यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार श्री देव निकुरे आणि चमू तसेच आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. निलेश ठवकर , समान संधी केंद्र समन्वयक प्रा. सरताज मालाधारी आणि रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. बिजनकुमार शील उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये मतदान विषयी जनजागृती करत असताना मतदानाच्या महत्त्व पटवून देण्यात आले तसेच नवीन मतदार नोंदणी करिता फार्म वाटप करण्यात आले.