✒️ योगेश मेश्राम चिमूर( मालेवाडा विशेष प्रतिनिधी)
मालेवाडा (दि.28 मार्च) :- चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालयामध्ये जागतीक टी. बी दिवसाचं औचित्य साधून दिनांक २४/०३/२०२३ रोज शुक्रवlरला मायक्रोबायोलॉजी विभागाकडून मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ ग्रामगीता मार्फत रlबिवण्यात आला.
या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील प्राचार्य. डॉ. आमिर धम्मानी सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निलेश ठवकर सर व डॉ. मृणाल व्हारडे सर तसेच मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रा. रोहित चांदेकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्तविक डॉ. युवराज बोधे सर यानी केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी कु. प्रगती पंधरे हिने केले, कु. वैष्णवी माडकं. कु.हीना राऊत व कु. अनल नगराळे या विदयार्थीनी ने टी. बी बद्दल उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. कु. स्नेहल लोखंडे हिने कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.