गोविंदपुर येथे २० ऑगस्टला स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्ये व महिला कार्यकर्त्यांची प्र. सं. म. प्र. काँग्रेस कमिटी ओबीसी चे धनराज भाऊ मुगले यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न 

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी ) 

चिमूर(दि.21 ऑगस्ट) :- या बैठकीत प्रामुख्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर संघटनात्मक चर्चा झाली तसेच स्थानिक महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी धनराज भाऊ यांना हिंदू धर्मातील पवित्र सण रक्षाबंधन निमित्य राखी बांधून दीर्घ आयुष्याच्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित संजय भाऊ अगडे तालुकाध्यक्ष नागभीड ओबीसी काँग्रेस , बंडूभाऊ आत्राम महेंद्र भाऊ दुधारे, अमजद भाई शेख , दीपक भाऊ पुस्तंडे , विजय भाऊ मेश्राम रफिक भाऊ नेवारे , प्रवीण भाऊ मसराम , गजानन भाऊ मसराम , धनराज भाऊ खांडेकर , विराज चेन्न , हंसराज भाऊ वासनिक , मधुकर मुंगले , सेवक रामटेके , रमेश भाऊ डडमल , भूषण कामळी , सुधाकर भाऊ कामळी , इसाद भाई शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते .