गोरख भांमरे यांनी गोंदिया पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला, तर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची पुण्याला बदली

✒️संतोष लांडे पुणे (pune प्रतीनिधी)

पुणे(दि.9 ऑगस्ट) :- 

संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. मागास नक्षलप्रभावी म्हणून गोंदिया जिल्ह्याची चांगलीच ओळख आहे. जिल्ह्यात आजपर्यंत अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी लाभलेले आहे, त्यांनीही आपल्या कार्याचा जिल्ह्यात ठसा उमटविला होता.

नुकतेच आपल्या वैशिष्ट्य कार्यशैलीने गोंदियाकरांच्या मनात स्थान निर्माण करणारे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली असुन. त्यांच्या जागेवर नागपूर शहरांचे पोलीस उपायुक्त गोरख सुरेश भामरे यांनी आज पदभार स्वीकारला आहे, यावेळी मावळते पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी त्यांचे स्वागत करीत पदभार सोपविला आहे, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक घटना गुन्हेगारीवर चांगलाच आळा घातला होता.

अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या देखील आवळल्या असे असले तरी नूतन पोलीस अधीक्षकांपुढे देखील जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शांतता राखणे, अवैद्य व्यवसाय बनावट दारू रेती जनावरांची तस्करी अमली पदार्थ शस्त्र बाळगणे तसेच वाहतूक समस्या तसेच वाढत्या गुन्हेगारीवर आदींना आळा घालण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

याशिवाय स्थानिक पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण हे करावे लागणार आहे, गोंदिया जिल्ह्यात गुन्हेगारीचा आणि अवैधधंद्याचा वाढता आलेख आहे, नागपूरातही भामरे यांनी आपल्या कार्याची छाप चांगलीच पडली होती.

गोरख भामरे 2017 तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत, नूतन विद्यमान पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी आज गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, तर मावळते पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गोंदिया जिल्ह्यात पदभार घेतल्यापासून जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे.