गोठ्याला आग लागून नुकसान झालेल्या पीडित शेतकऱ्यांना राजू चिकटे यांच्याकडून आर्थिक मदत

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.12 ऑगस्ट) :- वरोरा तालुक्यातील पाचगाव येथील दोन शेतकऱ्यांच्या गोठ्याला ११ ऑगस्ट च्या मध्यरात्रीनंतररात्री लागलेल्या आगीत एक बैल ठार तर पाच बैल जखमी झाले. तसेच गुरांचा चारा व शेती उपयोगी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या पिढीत शेतकऱ्यांना बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे यांनी आर्थिक मदत करून मदतीचा हात दिला आहे. 

वरोरा तालुक्यातील पाचगाव (ठाकरे) येथे रविवार दि.११ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर गोठ्याला आग लागून एका बैलाचा मृत्यू व पाच बैल जखमी, तसेच शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना आज सोमवार दि.१३ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. गोठ्यात पेटवलेल्या शेकोटी मुळे ही आग लागल्याचे म्हटले जाते. या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या वासुदेव सीताराम शेंडे यांचे बैल जखमी झाले. तर जनार्धन सीताराम शेंडे यांचा एक बैल मूत्यू झाला. तर दोन्ही शेतकऱ्यांची काही जनावरे जखमी झाली.

या आगीमध्ये जनावराचा चारा व शेती उपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले. मृतक बैलाची किंमत अंदाज ५० हजार तर गुरांचा चाळीस हजार रुपयांचा चारा आणि ५० हजार रुपयांच्या शेती उपयोगी वस्तू या आगीच्या भक्षस्थानी पडले असल्याचे म्हटले जाते. सदर घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच विद्यमान संचालक राजू चिकटे यांनी घटनेची दखल घेऊन ते ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनास्थळ काढन त्यांनी पीडित शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांना आर्थिक मदत केली.

या मदतीमुळे पिढीचा शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या वेळी जनार्धन शेंडे , वासुदेव शेंडे , पाचगाव येथील सरपंच किरण नंदकुमार ढोक, सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे , हरीश जाधव, पिंटू सातपुते, सचिन भोयर, ग्रामसेवक राजेश राठोड ग्रामसेवक, तलाठी गुरुदेव व सर्व गावकरी उपस्थित होते.