गोंडपिंपरी पोलिसांनी पकडला एक लाख रुपयाचा गांजा

🔹गाडीसह ८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.11 जुलै) :- पोलीस ठाणे गोंडपिंपरी येथील पोलीस स्टाफ शिवाजी चौक गोंडपिंपरी येथे नाकाबंदी करीत असताना रात्रौ 02.45 वाजता चे सुमारास एक बोलेरो गाडी क्रमांक MH 34 BG 4669 ही भरधाव वेगाने जात असताना दिसली सदर गाडीला थांबवुन गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 1,00,000/- रूपये किमतीचा 9.770 किलो गांजा मिळून आला.आरोपी शेरखान पठाण रा. बल्लारपूर याला अटक करुन 7,00,000/- रूपये किमतीचे बोलेरो गाडी व 100,000/- रूपये किमतीचा गांजा असा एकुण 800,000/- रूपये किमतीचा मुद्देमल जप्त केला आहे.

      सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी शिवलाल भगत यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे , पो .हवा मनोहर मते, नंदकिशोर माहुरकर, विलास कोवे,पोलीस अंमलदार तिरुपती गोंडसेलवार ,संजय कोंडेकर, नासिर सय्यद, प्रशांत नैताम यांनी केली आहे.