गिरोला गावात पसरले घाणीचे साम्राज्य

🔹ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष मंगेश घानोडे यांचा आरोप

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.1 जुलै) :- उन्हाळा संपून पावसाला सुरुवात झाली असून पावसाळा लागण्यापूर्वीच ग्रामीण भागातील नाल्यांचा उपसा केला जातो. मात्र वरोरा तालुक्यातील गिरोला गट ग्रामपंचायत पारडी यांनी नाल्यांचा उपसा नसल्याने रस्त्यावरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

त्यामुळे गिरोला गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप मंगेश घानोडे व गावकरी यांनी केला आहे.वरोरा तालुक्यातील गिरोला गाव हे नेहमी विविध कारणामुळे चर्चेत असते स्वच्छता पाणी अतिक्रमण आधी प्रश्नांमुळे गिरोला गाव चर्चा असते. अशातच नाली उपसा न झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.त्यामुळे गिरोला गावात राणीचे साम्राज्य पसरले आहे .पावसाळ्यात विविध आजारांचा धोका असतो मात्र ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.

नाल्या उपसा करण्यात यावे असे मागणी गावकऱ्याकडून ग्रामपंचायत पदाधिकारी याकडे केली जाते आहे.पण ग्रामपंचायत या कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे गिरोला ग्राम वाशी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे तात्काळ नाली सफाई करण्यात यावे अशी मागणी गिरोला ग्राम वाशी व मंगेश घानोडे यांनी केली आहे.