गिरसावळी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मनोज गाडगे तर उपाध्यक्षपदी राहुल नागपुरे यांची अविरोध निवड

🔹शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केले अभिनंदन

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.17 जुलै) :- तालुक्यातील गिरसावळी येथील सेवा सहकारी संस्था मर्या रं.न. ७४७ निवडणुकीत शिवसेना प्रणित परिवर्तन विकास पॅनलचे १२ पैकी १२ उमेदवार विजयी होऊन एकहाती वर्चस्व निर्माण केले होते.आज दिनांक १६ जुलै रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये १२ ही उमेदवारांनी एकमताने अध्यक्षपदी शिवसेनेचे शाखा प्रमुख मनोज गाडगे तर उपाध्यक्षपदी राहुल नागपुरे यांनी अविरोध निवड केली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी अभिनंदन केले आहे.

तालुक्यातील गिरसावळी येथील सेवा सहकारी संस्था मर्या रं. न. ७४७ निवडणूक दिनांक २३ जून रोजी संपन्न झाली. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन विकास पॅनलच्या वतीने १२ उमेदवार निवडणूक मैदानात उतरविण्यात आले होते. यामध्ये १२ पैकी १२ ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले होते. आज दिनांक १६ जुलै रोजी अध्यक्ष तथा उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत १२ ही विजयी उमेदवारांनी एकमताने अध्यक्षपदी शिवसेनेचे शाखा प्रमुख मनोज गाडगे तर उपाध्यक्षपदी राहुल नागपुरे यांची अविरोध निवड केली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी अभिनंदन केले आहे.यावेळी ज्ञानेश्वर घोडमारे,अनिल पिजदूरकर,मधुकर घोडमारे,अशोक पिजदूरकर,मारोतराव आत्राम,प्रभाकर आत्राम,खुशाल कुळमेथे,देवीदास आत्राम, चंद्रकला अहिरकर,पार्वता गिरसावळे तसेच गावकरी उपस्थित होते.