गरजूंना आर्थिक मदत तर दिव्यांगाना सायकल वाटप

🔹स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम

🔸श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व परम पुज्य भागवत सत्संग सोहळ्याचे औचित्य

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrwati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.13 मे) :- 

परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना सातत्याने मदत कार्य करण्यात येत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात एका दिव्यांग व्यक्तीला घरगुती वापरासाठी दिव्यांग चारचाकी सायकल तर गरजुला आर्थिक मदत करण्यात आली. निमित्त होते श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व परम पुज्य भागवत सत्संग सोहळ्याचे.

स्थानिक गौरी ग्रीन लॉन, श्री मंगल कार्यालय येथे अक्षय तृतियाच्या पावन पर्वावर दिनांक १० मे २०२४ रोज शुक्रवारला स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर तर्फे सदगुरु श्री संत गजानन महाराज, सदगुरु श्री संत साईबाबा, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ बाबा, भांदेवाडा यांच्या पादुकाचे ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी आगमन झाले. तिथे विधीवत पादुकांचे पुजन करून नगर परिक्रमा करण्यात आली व परम पुज्य भागवतमनिषी श्री मनिष महाराज यांचा सत्संग सोहळा पार पडला.

यावेळी मंचावर सदगुरु संताची उपस्थिती होती. वढा येथील सन्मा. गुरुवर्य संत श्री चैतन्य महाराज, हरणघाट येथील सन्मा. गुरुवर्य संत श्री मुर्लीधर महाराज, चंद्रपूर येथील सन्मा. गुरुवर्य संत श्री मधुबाबा महाराज, विदेही सदगुरु जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथील गुरुवर्य संत श्री बबनराव धानोरकर, गुरुवर्य संत श्री डाखरे महाराज, निरंकारी सत्संग मंडळ भद्रावतीचे किसनराव माटे तसेच जगन्नाथ महाराज मठ भद्रावतीचे केशव ताजणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या सोहळ्याचे औचित्य साधून ट्रस्टतर्फे तालुक्यातील नंदोरी येथील श्रीमती रत्नमाला पुरुषोत्तम चामाटे यांच्या घरचा कर्ता मुलगा मरण पावल्यामुळे ट्रस्टचा उपक्रम “विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम” अंतर्गत आर्थीक सहकार्य करण्यात आले.

स्थानिक जवळे प्लॉट येथील रहिवासी मधुकरजी लक्ष्मण नागपूरे यांना लकवा झाल्यामुळे चालणे फिरणे बंद झाल्याकारणाने ट्रस्टच्या “हिन्दुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना” अंतर्गत दिव्यांग घरगुती उपयोगाची सायकल प्रदान करण्यात आली. यांच्या धर्मपत्नी इंदिरा मधुकर नागपुरे यांनी ती स्वीकार केली.

अशा गरजू व गरीब नागरिकांनी ट्रस्ट च्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रविकांत वरारकर यांनी तर आभार प्रदर्शन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी पार पाडले.