खोकरी ग्रामपंचायत विरोधात ग्राम वाशी यांची विरु गिरिणे आंदोलन

🔸२९ मे २०२४ रोज बुधवारला दु.12 वाजता पाण्याचा टाकीवर चळून मारुती मांडवकर करणार आंदोलन

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28 मे) :- 

खोकरी ग्रामवाशीसाठी पाण्यासाठी मारुती मांडवकर यांची विरु गिरी मागील पंधरा दिवसा पासून खोकरी ग्रामवाशी यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षला वाचा फोडण्याठी मारुती मांडवकर मैदानात.

महाराष्ट्र सरकार मोठ्या प्रमाणात जल जिवन मिशन योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार यांनी प्रत्यक गावात आणि प्रत्यक घरी नळ दिले आहे. आणि या नळ योजनेतून कित्येक गावात मुबलक पाणी सुध्दा मिळत आहे .पण खोकरी गावांत जल जिवन मिशन योजनेचे उलटे काम आहे.जल जिवन योजने अंतर्गत खोकरी वाशी यांना घरो-घरी नळ मिळाले पण त्या नळाला १५-१५ दिवस पाणी नाही येत.तर महाराष्ट्र सरकार जल जिवन मिशन योजनेचा मोठा गाज्या-वाज्या करत ही योजना राबविण्यात आहे.

खोकरी गावात या योजनेची धज्या उडाली असल्याचे मांडवकर यांनी म्हणाले .खोकरी गावकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसा पासुन बरोबर पाणी मिळत नाही आहे. उष्णतेची जिल्हात लाट उसळली आहे.खोकरी ग्राम वाशी यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.खोकरी वाशी यांना मुबलक पाणी मिळू शेकते पण खोकरी ग्रामपंचायतच्या चूकीच्या धोरणामुळे खोकरी ग्रामवाशी याना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षचा विरोधात मारुती मांडवकर विरु गिरिणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जर या दोन दिवसांत खोकरी ग्रावाशीयांना पाणी नाही मिळाले तर अन्यथा खोकरी येथे २९ मे २०२४ रोज बुधवारला पाण्याचा टाकीवर चळून विरु गिरिने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा मारुती मांडवकर यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे. पाण्याच्या लढाईसाठी आणि संघर्षासाठी भविष्यत कायदा सुव्यवस्था व नियमांचे उल्लंघन झाल्यास स्वतः प्रशासन जबाबदार राहील असा ही इशारा मारुती मांडवकर यांनी दिला आहे.