खेमजई येथे २८ जुलैला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.26 जुलै) :- 

चला बदल घडवुया अंर्तगत सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरच्या गुरुदृष्टी नेत्रालयाच्या वतीने वरोरा तालुक्यातील खेमजई येथे २८ जुलै रोज रविवारला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

        प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर चेतन खुठेमाटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर प्रमोद गंपावर यांच्या हस्ते होत आहे.; यावेळी सुधाकर खरवडे, खेमजईच्या सरपंच मनीषा चौधरी, गुंजाळाचे सरपंच मधुकर चौधरी, खेमजईचे उपसरपंच चंद्रहास मोरे, पोलीस पाटील विश्वनाथ संभाजी बावणे, सामाजिक कार्यकर्ता किशोर डुकरे,अरविंद झाडे , रमेश चौधरी,ॲड.अरविंद पेटकर हे प्रमुख अतिथी म्हणून याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

        या शिबीराचा लाभ खेमजई परीसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.