खेमजई येथे वृक्षारोपण कार्यक्रम

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.29 जुलै) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या खेमजई येथे आज डोळे तपासणी तसेच चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता याचेच औचित्य साधून शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यात आंबा , चिंच , कडुनिंब , अश्या अन्य दिर्घाआयुशी वृक्षाची लागवड करण्यात आली. 

चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या हस्ते मौजा खेमजई वृक्षा रोपण करण्यात आले .

यावेळी

  डाॅ. प्रमोद गंपावार ,कन्हैयालाल जयस्वाल माजी सभापती जि.प.चंद्रपूर, खेमजई येथिल सरपंच मनिषा चौधरी,उपसरपंच चंद्रहास मोरे,माजी सरपंच संभाजी बावणे भटाळा,अरविंद झाडे,अॅड.अरविंद पेटकर, विश्वनाथ तुराणकर पोलीस खेमजई, माया झाडे सरपंच पोहा, किशोर डुकरे , रमेश चौधरी , संदीप सोनेकार, कामेष कूरेकार व अन्य ,सामाजीक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.