🔹सीड बॉल तयार करून विविध प्रजातीची लागवड
🔸भजन दिंडी व विद्यार्थी यांचे प्रचार प्रसार
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.16 जून) :- खेमजई येथे दिनाक १६ जून २०२४ रोजी पर्यावरण संवर्धनासाठी सीड बॉल तयार करून लागवड अनोखा प्रयोग राबविण्यात आला.
खेमजई येथे पशुधन अधिकारी म्हणून कार्यरत डॉ.अघडते यांनी वृक्ष लागवड करण्यासाठी बीज गोळे तयार करून लागवड करणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम मांडला. सदर संकल्पना ग्राम पंचायत, विकास ग्रुप व जिल्हा परिषद शाळा यांचेशी चर्चा करून राबविण्याचा निर्णय घेतला. शालेय विद्यार्थ्यांमार्फत बीज संकलनासाठी प्रति बी ऐक रुपया प्रमाणे आंबा, चिंच, कवठ, करंज यासारख्या प्रजातीचे २ हजार बीज गोळा केले.दिनाक १३ जून २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, ग्राम पंचायत पदाधिकारी, विकास ग्रुप , महिला बचत गट, गुरुदेव सेवा मंडळ या सर्वांनी शेण माती पासून ५ हजार सीड बॉल तयार केले.
तयार केलेले सीड बॉल गावाच्या हद्दीतील जंगलात लागवड करण्यासाठी दिनाक १६ जून २०२४ रोजी गाव ते कर्तबशहा वली टेकडी ३ किमी अंतर भजन दिंडी व विद्यार्थी रॅली काढण्यात आली. त्या दरम्यान वृक्ष लागवड विषयक प्रचार प्रसार करण्यात आला. या दिंडीत गावातील महिला व पुरुष भजन मंडळ, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्राम पंचायत पदाधिकारी, सर्व कर्मचारी , महिला बचत गटाच्या महिला, मुले मुली, युवा वर्ग, मनरेगा मजूर, ग्रामस्थ मंडळी उस्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी होते. सीड बॉल लागवड करण्यापूर्वी टेकडी परिसरात सरपंच मनीषा चौधरी यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.त्यावेळी प्रामुख्याने वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, विकास ग्रुप चे मार्गदर्शक डॉ.प्रमोद गंपावार, माजी सभापती….कन्हैयालाल… जयस्वाल,शिवसेना जिल्हा प्रमुख(उबाठा )मुकेश जिवतोडे, बंडू डाखरे माजी सभापती राजू चिकटे, खेमजई येथिल सरपंच मनीषा चौधरी,माजी सभापती छोटूभाऊ शेख, अरुण चौधरी, किशोर डुकरे, कृषी विकास संस्थेचे आशिष अहिर,इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमात अभिनव कल्पना मांडून साकार करणाऱ्या डॉ.सतीश अघडते यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपक्रम यशस्वितेसाठी काम केलेल्या विविध सामजिक संघटनांचा गौरव करण्यात आला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश चौधरी, विश्वनाथ तुराणकर, विलास चौधरी, शंकर धोत्रे, गोपाल राठोड, वैभव चौधरी ईश्वर हजारे, रोशन हजारे इत्यादीनी सहकार्य केले.याप्रसंगी मान्यवरांचे भाषणे झाली त्यामधे खेमजई गावात कामात काम करणारे कर्मचारी , ग्राम पंचायत कमिटी, विविध संघटना व ग्रामस्थ,जिल्हा परिषद शिक्षक यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच चंद्रहास मोरे, संचालन डॉ.सतीश अघडते यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक संजू जांभूळे यांनी केले. कार्यक्रमानंतर जंगल परिसरात विद्यार्थी व पाहुणे , ग्रामस्थ महिला यांनी सीड बॉल लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी खेमजई येथे राबविण्यात आलेला उपक्रम नाविन्यपूर्ण व प्रभावी असल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.