खांबाळा परिसरात दिवसाचे लोडशेडींग बंद

🔸शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या निवेदनाची दखल

🔹महावितरणचे कनिष्ठ अभियंता पिदुरकर यांनी दिली माहिती

✒️मनोज कासारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

 

भद्रावती(दि.3 नोव्हेंबर) :- दिनांक १८ ऑक्टोबर ला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्वात तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर यांचे नेतृत्वात महावितरणचे उपविभाग खांबाळा येथील कनिष्ठ अभियंत्याला निवेदन देवून खांबाळा परिसरातील लोडशेडींग बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. याची दखल घेवून या परिसरात दिवसाचे  थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

आमचे प्रतिनिधीनी खांबाळा परिसरातील कनिष्ठ अभियंता श्री. पिदुरकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आज (दि.०२ ऑक्टोबर) पासून दिवसाचे लोडशेडींग बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे दिवसाचे थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. 

वरोरा तालुक्यातील खांबाळा परीसरात विजेचा मोठा लपंडाव सुरु होता. अगोदरच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात येणारे सोयाबीन पिक गेले. बळीराजा संकटात सापडला. आता दुसऱ्या पिकासाठी मशागत करून जमिन तयार करावी लागली.

मात्र लोडशेडींगच्या नावाखाली विजेचा लपंडाव खेळ सुरु होता. तो बंद करावा अन्यथा वरोरा तालुक्यातील शिवसेना (उबाठा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी खांबाळा येथील कार्यालयात दिलेल्या निवेदनातून दिला होता.

सर्वप्रथम शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी दिनांक १८ ऑक्टोबरला महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला दिवसा व रात्री थ्री फेज वीजपुरवठा करण्याबाबत निवेदन दिलेले होते. त्यानंतर परत २७ ऑक्टोबरला निवेदन देवून पाठपुरावा करण्यात आलेला होता. स्वतः शिवसेना पदाधिकारी महावितरणच्या संपर्कात होते.

या निवेदनाची दखल घेवून महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी खांबाळा चे कनिष्ठ अभियंता यांनी दिवसाची थ्री फेज वीजपुरवठा सुरू केला असल्याची माहिती दिली आहे.

हे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यश आहे. त्यामुळे कुठल्याही खोट्या आंदोलनाला बळी पडू नये व वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. कोणत्याही शेतकऱ्याला महावितरण कडून त्रास असल्यास वरोरा येथील शिवालय या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी केले आहे.