खांबाडातील युवकांनी पावसात अडकलेल्या शालेय विद्यार्थीला केली मदत The youth of Khambada helped a school student stuck in the rain

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.21 जुलै) :- वरोरा तालुक्यातील बोडखा महालगावं कोठा गावातील शालेय विद्यार्थी नेहमीप्रमाणे महामंडळ बस ने शाळा सुटल्यानंतर गावाला जाण्यासाठी सज्ज झाले.

तेव्हा खांबाडा येथे मुसळधार पाऊस सुरु झाला त्यानंतर महामंडळ च्या वाहनचालकाला अशी माहिती मिळाली की कोसरसार, वाठोडा नाला भरलेला असल्यामुळे बस नेणे शक्यच नव्हते त्यावेळी शालेय विद्यार्थी पूर्ण भिजलेले होते .

तब्बल दोन तास महामंडळ चे कर्मचारी विद्यार्थीची काळजी घेऊन त्यांच्या सोबत थांबले दोन तासानंतर सुद्धा नाल्याच पाणी उतरले नाही असे माहित होताच शालेय विद्यार्थी त्यांचा गावात कसे पोहचावी ही सुद्धा चिंतेची बाब होती.

त्यावेळी शालेय विद्यार्थी बस सोबत खांबाडा स्टॉप वर थांबून दिसलें असता खांबाडा येथील ग्रामपंचायत सदस्य सूरज बावणे व युवक काँग्रेस उपतालुका प्रमुख यांनी वाहन चालकांना पुर्ण माहिती विचारली व पुर्ण विषय समजून घेतला. ग्रामपंचायत सदस्य सुरज बावणे,रिजवान शेख, ग्रामवासी बेले, विठ्ठल आत्राम यांनी तब्बल 30 शालेय विद्यार्थीची जेवणाची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.

त्यावेळी खांबाडा वासियांनी सामाजिक बांधलीकी जपून विद्यार्थीची मदत केली त्यावेळी विद्यार्थीच्या पालकांनी खांबाडा वासियांचे कॉल द्वारे आभार मानले.