क्रिकेटर अनिल कुंबळे निमढेला गेट रामदेगी परिसरातील भानुसखिंडी वाघिन व तिचे बच्चे यांच्या प्रेमात

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.4 जानेवारी) :- 

चंद्रपूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये अनेक सिनेकलाकार येत असून या सोबतच सुप्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकर येत असून त्यांच्या परिवाराला ताडोबाच्या मोह लागला असून दर वर्षी ते आपल्या कुटुंबास येत असतात. परंतु आज क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचे सहकारी मित्र सुप्रसिद्ध पूर्व क्रिकेटर अनिल कुंबळे यांनी देखील या व्याघ्र प्रकल्पाला भेट देत येथील व परिसरातील जंगलाची सफारी करून वाघीण व तिचे तीन बच्चे यांच्या प्रेमात पडले असल्याचे त्यांनी सांगितले.. या नंतर देखील दरवर्षी आवर्जून येईल अशी ग्वाही दिली..

मागील वर्ष भरा पासून निमढेला गेट वर सिलेब्रेटी तसेच क्रिकेटर यांचा ओघ वाघाना बगन्या करिता बफ्फर क्षेत्रातील निमढेला गेट वर वाढत असून गेट वरील उत्तम नियोजन आणी गेट इन्चार्ज श्री मिलिंद किटे यांचा तसेच गेट वरील व्यवस्थापन यांचा कडून मिळणारे आदर तिथ्य यांच्यामुळे तसेच् या परिसरात वाघ दिसण्याची हमी असल्याने मोठ मोठे सिलेब्रेटी आता निमढेला गेट वर येऊ लागले..