क्रांतीसुर्य महात्मा फुले नाव देण्याने रासकर पार्क परिसराचे महत्व वाढले- सत्यशोधक ढोक The importance of the Raskar Park area increased by naming the Krantisurya Mahatma Phule… Satyshodhak Dhok

🔸रमाई माता यांच्या स्मृतिदिनानिमित्त रासकर पार्क चौकाला क्रांतीसुर्य महात्मा फुले नाव देण्याचा सोहळा संपन्न(On the occasion of Ramai Mata’s memorial day, the ceremony of naming Raskar Park Chowk as Krantisurya Mahatma Phule was completed)

✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.28 मे) :- मांगडेवाडी कात्रज,पुणे येथील मुख्य चौकाला दि.२७/५/२०२३ रोजी रात्री ७ वाजता.क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाच्या फलकाचे उद्घाटन नटश्रेष्ठ कुमार आहेर व फुले एज्युकेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक करण्यात आले तसेच फलकाला भव्य हार देखील घालण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.हरीश बंडीवडार,अमित शिंदे,जोशी काका.पिंगळे साहेब,विठ्ठल साखरे,निवृत्त प्राचार्य बनकर उपस्थित होते.

यावेळी कुमार आहेर यांनी मी जोतीराव बोलतोय या नाटकातून त्यांचा जीवनपट आणि क्रांतिकारी प्रसंग सागून महात्मा फुले यांनी केलेल्या अनेक कार्याला उजाळा दिला 

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी प्रतिपादन केले की या रासकर पार्क मधील मुख्य चौकाला क्रांती सूर्य महात्मा फुले नाव दिल्याने या परिसराचे उलट महत्व वाढले असून या नावामुळे या भागात वाईट गोष्ठी घडणार नसून उलट या महापूर्षांचे आचार विचार आचरणात कसे येईल आपले मुले उच्चशिक्षित बनून नावलौकिक मिळवतील अशी आशा असून या चौकात जे गार्डन आहे त्याला देखील चांगले करून सावित्रीजोती उद्यान नाव द्यावे म्हणजे या परिसराला अधिक महत्व प्राफ्त होऊन सर्व महापूर्षांचे जयंती पुण्यतिथी कार्यक्रम करण्यासाठी आपणास प्रेरणा मिळेल असे देखील ढोक म्हणाले.

कार्यक्रमाचे आयोजन नवनाथ झगडे,पांडुरंग साठे, नितीन साठे,एकनाथ शिंदे,नितीन सावंत,विनायक पात्रे ,उमेश वर्तक यांनी केले तर आभार गणेश ठोंबरे यांनी मानले आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता महात्मा फुले रचित सत्याचा अखंड कुमार आहेर यांनी सर्वांकडून म्हणून घेतला त्यानंतर सर्व महापूर्षांचे जयघोषाने परिसर घुमगुमला होता.