क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौक चंदनखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadarwati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.19 फेब्रुवारी) :- तालुक्यातील चंदनखेडा येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौक येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिलजी चौधरी, माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते, सेवानिवृत्त शिक्षक माधवराव दोडके, यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आरती सुद्धा करण्यात आला.उपस्थित युवकांनी महाराजांच्या नावाचा जयघोष केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर दोडके, शाहरुख पठाण, मिलिंद पठाण,चंद्रभान बोंडे,दिलिप कुळसंगे, अरूण पिल्लेवार,मारोती दोहतरे, वासुदेव दडमल, बंडु दडमल,मंगेश हनवते,माजी ग्रामपंचायत सदस्या अमृता कोकुळे, चंद्रकला दोडके, कविता दडमल,सुरेखा महागमकार, कल्पना दडमल, राजकुमारी शोभनिकर,निराषा नन्नावरे, कल्पना चौधरी,कमल दडमल,बेबी गायकवाड, शौर्य क्रिडा मंडळाचे सदस्य राहुल कोसुरकार, शंकर दडमल,दिलिप ठावरी, दिनेश दोडके, देवानंद दोडके, आदित्य दोडके, निखिल दोडके, प्रज्वल बोढे, पंकज दडमल, विशाल हनवते, अमोल महागमकार,भुपेश निमजे, कुणाल ढोक,मोहित शेंन्डे, आशिष हनवतेआदि प्रामुख्याने उपस्थित होते.