✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.8 जून) :- येथे मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) अंतर्गत खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय वरोरा यांनी आयोजन केले.
सदर कार्यक्रमात एक गाव एक वाण या संकल्पनेवर आधारित एक जिनसी व स्वच्छ कापूस मिळावा याकरिता कश्याप्रकारे नियोजन करावे जेणेकरून जिंनिंग मध्ये कापसाच्या गाठी बनवून त्याचा आंतर राष्ट्रीय बाजारपेठेत नफा शेतकऱ्यांना मिळेल याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच कृषी विभागाच्या विवीध योजना, माती परिक्षणाची महत्व, खरिप हंगाम पूर्व तयारी, सरी वरंबा वर लागवड करणे, बीजप्रक्रिया, बीज उगवण क्षमता तपासणी, सेंद्रिय शेती अंतर्गत निंबोळी अर्क, जीवामृत तयार करण्याची प्रक्रिया, दशपर्णी अर्क, वाणाची निवड, कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी वरोरा-श्री जी के पाटील,कृषी अधिकारी – श्री एम एस वरभे.
कृषी पर्यवेक्षक- कु एल एम दुर्गे, कृषी सहाय्यक- श्री टापरे, कू शिवानी गुजरकर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक -वरोरा कु. एम एस आसेकर उपस्थित होते. तसेच गावचे प्रमुख पाहुणे सरपंच -श्री गणेशराव माटे, पोलिस पाटील श्री.अशोकरावजी भेदुरकर, प्रगतशील शेतकरी – विठ्ठलराव ठोंबरे,श्री श्रीधरराव काळे, उपस्थित होते.