✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)
कोरपना(दि.10 जून) :- तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला परंतु अजूनही शेकऱ्यांना पीक विमाचा फायदा झाला तसेच मागील काही महिन्या मध्ये शेतकऱ्यांच्या शेताचे खूप मोठे नुकसान झाले व त्यांचे पंचनामे होऊन सुद्धा शासनाने अजुनहि मदत दिली नाही आज जवळ पास पीक विमा काढून वर्ष होऊन गेलं तरी शासन या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी टाळा टाळ करत आहे.
आज जवळ पास 100 % मधून 50 % शेकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टी फायदा झाला आणि 50 % शेतकरी हें पीक विमा आणि अतिवृष्टी पासून वंचीत आहे त्यात या सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला होता त्याचा सुद्धा या शेतकऱ्यांना फायदा झाला आज पावतो शेत करी खूप संकटा मध्ये सापळून आहे तरी या सरकारच या शेतकऱ्या कडे दुर्लक्ष आहे एकीकडे कापसाला भाव दुसरी कडे शेतकऱ्यांची फाशी लागून मारायची वेळ आली तरी या सरकारला जाग आली नाही.
जर असंच चालू राहील तर एक दिवस हा शेतकरी या सरकार धारेवर धरून आंदोलन करणार याच्या शिवाय शेतकऱ्या कडे पर्याय नाही जों पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा ची आणि अति्रुष्टीची मदत देणार नाही तोपर्यंत आम्ही स्वतः बसणार नाही वेळ पडली तर आंदोलन करू या सरकारच्या विरोधात अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते जिल्हा अध्येक्ष अरुण पा नवले यांनी केली.