🔹महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची चक्क प्रवर्तन निदेशक राहुल नवीन यांच्याकडे पुराव्यासह मागणी
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.1 ऑगस्ट) :- जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खाजगी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व इतर अधिकारी हे वर्षाकाठी 80 कोटीच्या वर बेकायदेशीर वसुली करून स्वतःची गडगंज संपत्ती मिळवीत असल्याने या परिवहन अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करून ईडी मार्फत चौकशी करा व त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी यांनी स्थानिक प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, मनसे जिल्हाध्यक्ष राजू कुकडे, मनसे जनहीत कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुढे शहर अध्यक्ष पियुष धुपे उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आता प्रादेशिक परिवहन कार्यालय झाले असून इथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या कडे प्रादेशिक परिवहन अधिकारी चा चार्ज दिला गेला आहे तर सहाय्यक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणुन चार्ज दिला गेला आहे, या कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कुठलेही कायदेशीर काम होतं नसून साधे ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी सुद्धा एजंट मार्फतच जावे लागते अन्यथा फेल केल्या जाते.
या कार्यालयात मोठ्या प्रमाणात वाहन मालकाकडून बेकायदेशीर वसुली होत असून वरील गैरअर्जदार हे ही वसुली करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे अरुण टोंगे, रवी निवलकर, संजय नगराळे, राहूल नगराळे, देवा गोंगले, दिपक खाडीलकर, रमेश नळे, मनोज घडसे, गणवीर, कुणाल नगराळे, पंकज व अतुल माळवे ह्या खाजगी लोकांना शासनाची कुठलीही मंजुरी न घेता बेकायदेशीर कार्यालयीन कामे व वसुली करिता एजंट म्हणुन नियुक्त केले आहे, वास्तविक पाहता उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरमध्ये कार्यालयीन कामांकरिता शासनाने कोणतेही खाजगी कर्मचारी नेमले नसतांना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी खाजगी ट्रान्सपोर्टर व नवीन गाड्यांच्या शोरूम मालकाकडून व गाड्या पासिंग च्या नावाखाली अवैध वसुली करिता यांना ठेवण्यात आले आहे.
या कार्यालयात एका वर्षात जवळपास एक लाख वाहने नोंदणी होतं असतात तर तेवढेच नागरिक लायसन्स सुद्धा काढतात यामधून यांनी नेमलेल्या एजंट आणि दलाला मार्फत प्रत्येकी 500 रुपये हे बेकायदेशीरपणे या अधिकाऱ्यांच्या घशात जातात म्हणजे वर्षाकाठी जवळपास गाड्या पासिंग व लायसन्स मिळून हे 10 कोटी कमावतात, सोबत फिटनेस व गाडी ट्रान्सफर यासाठी सुद्धा त्यांचे रेट ठरलेले आहेत यातून 2 कोटी रुपये कामावतात, जिल्ह्यात जवळपास ट्रक, हायवा व सिमेंट कंपन्यात चालणारे ट्रक इत्यादी मिळून 10 हजार पेक्षा जास्त गाड्या आहेत त्यातून एंट्री फी च्या नावावर 3 हजार ते 7 हजार हे एजंट मार्फत वसुल करतात त्यांचे महिन्याकाठी 5 कोटी तर वर्षाकाठी 60 कोटी रुपये हे कामावितात.
एवढेच नाही तर तेलंगना राज्य सिमा नाका आहे त्या रोड ने कमीतकमी 500 गाड्या चालतात त्या गाडयांकडून प्रत्येकी 500 ते 700 रुपये घेतात त्याची रक्कम 3 लाख रुपये याप्रमाणे महिन्याकाठी 90 लाख तर वर्षाकाठी 10 कोटी 80 लाख रुपये हे कमावितात असे एकूण ते 80 कोटी 80 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम कमावितात सोबतच गाड्यांचे टॅक्स सेटलमेंट यातून वर्षाला दोन चार कोटी हे कमावतात तर गाड्यांच्या बोगस रजिस्ट्री सुद्धा येथे केल्या जातात.
या प्रादेशिक परिवहन कार्यालयात होतं असलेल्या भ्रष्टाचाराची अनेकांनी लाचलुचपत विभागाला, राज्याचे परिवहन मंत्री यांना व स्थानिक जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी दिल्या, मात्र यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व सहाय्यक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम हे एवढे छातीर आहे की समोरच्यांना पैसे देऊन गप्प करतात दरम्यान मोटार वाहन निरीक्षक कलबरसिंग कलसी यांच्याकडे वसुलीच्या पैशाचं काम आहे तेच सर्वाना मैनेज करतात.
याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी हे काहीही बोलायला तयार नाही त्यामुळं हा भ्रष्टाचार जोरात सुरू असून या प्रकरणी ईडी मार्फत चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात धाड टाकून चौकशी करावी व सत्यता पडताळणी करिता प्रमुख अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी आणि दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अन्यथा आपण सुद्धा त्यांच्यासोबत मिळाल्यास आम्ही या संदर्भात पुराव्यासह न्यायालयात दाद मागू असा इशारा मनसे वाहतूक सेनेच्या माध्यमातून निदेशक, अंमलबजावणी संचालनालय यांना दिला आहे.