केअर कंपॅनियन प्रोग्राम द्वारे माता व बाल म्रुत्युवर नियंत्रण मिळविणे होणार सोपे

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.23 जुलै) :- उप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक १९ जुलै २०२४ ला केअर कंपॅनियन प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे नूरा हेल्थ च्या वतीने मुख्य स्पिकर डॉ निलेश गावंडे हे होते.हा ट्रेनिंग प्रोग्राम सर्व परिसेविका,अधिपरीचारीका,कौन्सिलर,ए.एन.एम.स्टाफ व सर्व विभागांचा नर्सिंग स्टाफ यांच्या करीता आयोजीत करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सर्व माता व बालकांसोबतच ईतर रुग्णांना उच्च दर्जाचे आरोग्य प्रशिक्षण रुग्णालयांत पुरविणे सोबतच रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर घरी नातेवाईक यांनी रुग्णांची कशी काळजी घ्यायची याचे प्रशिक्षण सर्व परीचारिकांना व संबंधित कर्मचारी यांना देण्यात आले.आणी या सर्व प्रशिक्षणार्थीनी रुग्णांना व नातेवाईक यांना दररोज प्रशिक्षित करणे आहे.रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर रूग्णांची घरी हेळसांड होऊ नये योग्य ती काळजी घेण्यात यावी यासाठी प्रक्षिशीत केल्या जाते.

या प्रशिक्षणामार्फत एक टोल फ्री नंबर आहे त्यावर नंबर डायल केला तर तुम्हाला गरोदर माता व असंसर्गजन्य आजारांविषयी माहिती व्हाट्स ऍप द्वारे मिळतें. लहान बालकांचे आजार, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक व मधुमेह, उच्च रक्तदाब,काॅन्सर, ईत्यादी प्रकारचीं माहीती व सल्ला दिला जातो.कोणीही हा १८००८८९३६६९ नंबर डायल करून योग्य मार्गदर्शन, माहिती घेता येते व निरोगी जिवन जगता येत.तळागाळातील लोकांपर्यंत पोहचुन त्यांना आजारांबाबत जाग्रुत करून निरोगी जिवन देणें हा शासनाचा उद्देश आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात चार प्रकारचे फ्लिप चार्ट (प्रसूती-पूर्व, प्रसूती-पश्चात, नवजात बालक व असंसर्गजन्य आजार) परिचारिकांना देण्यात आलेले आहेत त्याद्वारे त्या आपापल्या वॉर्ड मध्ये आरोग्यविषयी माहिती रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना देतात व त्यांनतर रुग्णांना टेक-अवे (माहिती पुस्तिका) देण्यात येते यांवर संपूर्ण माहिती दिली आहे. प्रत्येक कुटूंबाला त्यांचे वाटप केले जाते.या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन रूबीना खान यांनी केले.

नेहा ईंदूरकर एनसिडी कौन्सिलर यांनी या कार्यक्रमांची संकल्पना समजून सांगितली.वंदना बरडे यांनी प्रास्ताविक केले व आभारप्रदर्शन संगिता नकले यांनी केले.याचे प्रात्यक्षिक रुग्णालयात रुग्णांसोबत व नातेवाईक यांच्या सोबत करण्यात आले आणि हे प्रात्यक्षिक वैष्णवी भोंडवे अधिपरीचारीका यांनी घेतलें.या कार्यक्रमामुळे माता म्रुत्यु,बाल म्रुत्यु, इतर म्रुत्यु कमी होऊन चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा मीळू शकते.आणी वेळेतच आजारांवर नियंत्रण मिळवता येते.