✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.11 जुलै) :- दिनांक १०जुलै २०२४रोजी चिमूर तालुक्यातील मौजा बोथली, खानगाव, सावरी शिवारामध्ये वातावरणाच्या बदलामुळे कापूस व सोयाबीन पिकावर आलेल्या विविध किड व रोगाची पाहणी करण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील शास्त्रज्ञ डॉ. नागदेवते साहेब यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत बोथली येथील श्री देवीदास ननावरे श्री संदीप थुटे व सावरी येथील श्री विलास उमरे यांच्या शेतावरील सोयाबीन पिकावरील विविध किडीची पाहणी केली .
सदर पहाणीवेळी मुख्यतः सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात विविध अळीचा प्रादुर्भाव आढळून आला असून अनियमित पाऊस आणि दमट हवामानामुळे वातवरण किडींसाठी पोषक बनल्याचे शास्त्रज्ञान मार्फत सांगण्यात आले तसेच पुढील पाच ते सहा दिवसात पावसाचा खंड पडला तर हवामान दमट राहून किडींचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचे संकेत डॉ. नागदेवते साहेबांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी शेतकरी बांधवांनी फवारणी करताना योग्य ती काळजी घेऊन आणि पावसाचा अंदाज पाहून फवारणी करावी असे सांगण्यात आले. कीड नियंत्रणाबाबत फवारणी करिता कीटकनाशकांची माहिती देण्यात आली .
1.प्रोफेनोफोस 50% एसी २० मिली
2.इमामेक्टिन बेंजोएट 1.9% 5.6 मिली
3.इंडोझाकार्ब 15.8% पीसी 7.5 मिली
4.नोव्हेलेरोन 5.25% + इंडॉझाकार्ब 4.5% 17 मिली
5.थायमिथॉक्झाम 12.6% +लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5% 2.5 मिली
6.क्लोरेनट्रॉनिलीप्रोल9.3%+लॅमडासाहॅलोथ्रीन 4.6% 4मिली
या कीटकनाशके फवारणी करीता मार्गदर्शन केले.
त्यावेळी तालुका कृषी अधिकारी चिमूर श्री तिखे साहेब,कृषी अधिकारी चिमूर श्री शेंडे साहेब, मंडळ कृषी अधिकारी चिमूर श्री रामटेके साहेब तसेच कृषी पर्यवेक्षक चिमूर ,श्री सोनवणे साहेब,कृषी पर्यवेक्षक चिमूर ,चव्हाण मॅडम कृषी सहाय्यक श्री मापारी व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.