🔸शेतकरी नेते मनीषभाऊ जाधव
कृषी विभाग
✒️ गजानन लांडगे (यवतमाळ प्रतिनिधी)
यवतमाळ (दि.9 फेब्रुवारी) :- व्यवस्था व यंत्रणा ही समाजाच्या हितासाठी व प्रगतीसाठी निर्माण झालेली आहे मात्र आपल्या कृषीप्रधान देशातील शेतकरी कायम शोषित पीडित उपेक्षित राहिला आहे प्रशासकीय व्यवस्थेत काही माणसं असतात जी विकासात्मक प्रवाहपासून दुर्लक्षित राहिलेल्या त्या वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायम अविरत प्रयत्नवादी असतात तर ते प्रयत्न हे एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे तर ते एक ” सच्चा माणूस ,’ म्हणून काळ्या आईशी इमान ठेवून त्या घटकाप्रती आपल्या कर्तव्याचा निष्ठेने निर्वाह करणारे अधिकारी आज अभावानेच दिसून येतात .
शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशीलता ठेवून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून त्यावर प्रभावीपणे उपाययोजना देऊन शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांचं जीवनमान कसा सुधारेल यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत शेतशिवारात जाऊन त्यांच्याशी एकरूप होऊन संवाद व समन्वयाच्या माध्यमातून प्रयत्न करणारे यवतमाळ जिल्ह्याचे संवेदनशील जिल्हाधिकारी श्री अमोल भाऊ येडगे मुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य ,
कुटुंबातील स्त्रियांचे स्थान अत्यंत महत्त्वाचं असून शेतीतील देखील त्याच श्रमाचं योगदान याचा वाटा मोठा असून महिला शेतकऱ्यांना देखील आपल्या शेतीच्या नियोजनामध्ये निर्णय प्रक्रियेत त्यांचं स्थान ठेवून त्यांचा यथोचित सन्मान करा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात करून कृषी पूरक व्यवसायामध्ये शेतीला पूरक व्यवसाय जोड देऊन आपल्या आर्थिक उत्पादनात वाढ करा.
पीक पद्धतीत बदल करा असे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना आज जिल्हाधिकारी यवतमाळ अमोल भाऊ येडगे साहेब यांनी दारवा तालुक्यातील गाजीपुर या गावातील प्रगतशील शेतकरी जगदीश चव्हाण यांच्या शेतशिवारात घेण्यात आलेल्या पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या आज कृषी शास्त्रज्ञ मंच यवतमाळ कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये शेतीसाठी ड्रोन चा वापर त्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी ड्रोनचे पूजन करून याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या समवेत पाहिले या संदर्भात राहुल चव्हाण पायलट कृषी शास्त्रज्ञ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना या ड्रोन फवारणी यंत्राबाबत फायदेशीर महत्व अधोरेखित करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंका प्रश्नांना निरसन करून सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतकऱ्यांना भावनिक आव्हान केले.
शेतकऱ्यांचे आराध्य दैवत हरितक्रांतीचे प्रणेते यांच्या पावन पदस्पर्शाने या यवतमाळ जिल्ह्याची मातृभूमी पुनीत झाली अशा महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या गृह जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हे समाज मनाला अस्वस्थ करणारा वास्तव असून या आत्महत्या होऊ नयेत म्हणून कृषी शास्त्रज्ञ मंचाच्या व्यासपीठावरून जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या यशोगाथा त्यांचे अनुभव हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचं मोठं काम या कृषी शास्त्रज्ञ मंचाच्या वतीने होईल असा असावा त्यांनी व्यक्त केला व त्यासोबत शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचा पाऊल उचलू नये आत्महत्या हे पर्याय होऊ शकत नाही असे मत शेतकरी नेते मनीषा भाऊ यांनी यावेळी व्यक्त केले .
शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या सर्व सदस्यांनी आपापली अनुभव कथन केले हे कार्यक्रम यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला नवनाथ कोळपकर जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी , कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य अधिकारी नेमाडे साहेब , प्रमोद भाऊ मगर , कीटक शास्त्रज्ञ , राहुल चव्हाण ड्रोन पायलट शस्त्रतज्ञ , विविध विभागातील जिल्हा पातळीवरील सर्व अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित होते.