कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.22 डिसेंबर) :- ( अकोला नं-२ ) येथील सेंद्रिय उत्पादक शेतकरी श्री नत्थूजी गारघाटे यांनी स्वतःच्या शेतावर केलेले विविध नाविन्यपूर्ण प्रयोग प्रत्यक्ष बघण्याकरिता आज कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी ,वरोरा श्री सुशांत बी. लव्हटे , मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु.श्री विजय काळे ,कृषी पर्यवेक्षक श्री प्रफुल आडकीने यांनी प्रत्यक्ष शेत बांधावर जाऊन पाहणी केली.

श्री नत्थु गारघाटे यांच्या शेतावरील सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेली ज्वारी,बाजरी,हरभरा,गहू व जवस इ.पिकाची पाहणी केली.तसेच त्यांनी वापर केलेल्या सेंद्रिय व जैविक निविष्ठा ची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी शेतकरी नत्थूजी गारघाटे यांनी जिवामृत कसे तयार करावे व त्याचा योग्य वापर याबाबत उपस्थितांना माहिती दिली.

तालुका कृषी अधिकारी, श्री सुशांत लव्हटे यांनी सेंद्रिय व जैविक शेतीचे फायदे,सोयाबीन व हरभरा पिकावरील बुरशी रोगाचे संकट व त्यावरील उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.

 श्री व्ही.पी.काळे मंडळ कृषी अधिकारी शेगांव बू यांनी बुरशीजन्य रोगावर ट्रायकोडर्मा चा वापर करण्याच्या विविध पध्दती,जवस लागवड ,हरभरा पिकावरील विविध कीड व रोग , कापूस फरदड निर्मूलन इ. विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच श्री.पी.एस.अडकिने कृषी पर्यवेक्षक शेगाव बू 1 यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताचा वापर, एकात्मिक रब्बी ज्वारी चे व्यवस्थापन इ विषयी माहिती दिली .कृषी सहाय्यक श्री पवन मत्ते यांनी या क्षेत्रीय भेटीचे परिपूर्ण नियोजन केले. याप्रसंगी पिंपळगाव,राळेगाव,चारगाव बु. ,बेंबळा व वायगाव परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.