कुसुंबी खदान कोलाम आदिवासी शेतकऱ्यांनी बंद पाडली 

🔸आंदोलन कर्त्याचा आक्रोश 

✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)

कोरपना(दि.25 सप्टेंबर) :- गडचांदूर स्थीत माणिकगड सिमेंट च्या अल्ट्राटेक सिमेंट कपंनी च्या कुसुंबी येथील 18 आदिवासी कोलाम समाजाच्या शेतकऱ्याचा संघर्ष 1 दशकापासून सुरु आहे मात्र गरीब दारिद्रय जिवन जगण्याची नामुष्की या कुंटूबावर आली.

 पोलीस प्रशासन महसुल कडे बोट दाखवून महसुल कडे प्रकरण देतात महसुल विभाग फक्त चोकशी व अहवाल मागविण्यात वेळ घालवून प्रकरण लोंबकळत ठेवल्याने बाधीत कुटुंबाने असंतोष निर्माण झाला अरवेल जमिनीच्या ताब्यासाठी स्वतःच्या शेतात जाऊन उतखन सुरु असलेल्या ठिकाणी आज दि 23/9/2024 ला आदिवासी महिला पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश सहसचिव यांच्या नेतुत्वात ठिय्या आंदोलन बेमुदत साठी मांडला यामुळे खदानीचे वाहतूक बंद पाडून आदिवासीच्या जमिनी वरील कपंनी अतिक्रमण हटविण्यात यावे आदिवासी कोला म शेतकऱ्याना ताबा देण्यासाठी बेकायदेशीर बळकाविलेल्या जमीन परत देण्यात यावे जमिनीचा मोबदला नुकसान भरपाई देण्यात यावी कोलाम आदिवासी जमीन घेतल्या परंतु एक ही आदिवासी कोलामाना नोकरी दिली नाही स्थानिक लोकावर अन्याय कपंनीने केलेले आहे.

 माणिकगड सिमेंट कपंनी च्या कुसूंबी नोकारी येतील सम्पूर्ण जमिनीचे भूमापन मोजणी करण्यात यावे 3/7/2013 च्या बनावटी ग्रामसभा नाहरकत दाखवून 190 42 हेक्टर जमीन संपादनास दाखल प्रस्ताववर जमीन 4 था टप्पा साठी आदिवासी शेतकऱ्याचा विरोध असल्याने व आक्षेप असल्याने 11/8 /23 च्या ग्रामसभेच्या ठराव क्र 13 नुसार शासनाने कार्यवाही करून आदिवासी क्षेत्रातील प्रस्ताव नामंजूर करा इत्यादी मागण्या घेऊन प्रकल्प बा धीत ठिय्या आंदोलनावर ठाम आहे यामुळे खदान परिसरात वातावरण तणाव पूर्ण असून ठाणेदार शिवाजी कदम आपल्या ताप्या सह पोलीस चोख बंदोबस्त केला आहे.

जिवती येतील नव्यानेच रजू झालेले तहसीलदार रुपाली मोबरकर नायब तहसीलदार सागर वाहने यांनी आंदोलन कर्त्याची भेट घेऊन आंदोलन थांबविण्याचा आग्रह केला मात्र आंदोलकर्ते मागणी पूर्ण झाल्या शिवाय हटणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे त्याचे पर्यंत अफसलं ठरले अरुण उदे भाऊराव कनाके जंगू पेंदोर केशव कुळमेथे रामदास मंगाम भिम मडावी गणेश सिडाम रामकिसन आत्राम सह शेकडो आदिवासी आंदोलनात सहभागी झाले आहे.