किशोर दादा टोंगे यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी Kishore Dada Tonge inspected the flood situation

▫️शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन(Promise to get compensation to farmers)

▫️शेतकऱ्यांचे नुकसान पाहून डोळे पाणावले(Tears in the eyes of the farmers at the loss)

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.20 ऑगस्ट) :- शनिवारच्या रात्री पासून शेगाव चारगाव तसेच परिसरात मुसळधार सह जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. 12ते18तास चालणाऱ्या या मुसळधार पावसाने परिसरातील सर्व नदी नाले धोधो वाहू लागले व चारगाव मध्यम प्रकल्प चारगाव धरणाला महापूर आल्याने पुराच्या पाण्याने महारुद्र रूप प्राप्त करून सर्वत्र पाण्याचे तांडव पाहायला मिळत आहे.

या महा भयानक पुराणे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू च्या धारा वाहू लागल्या आहेत हे कळताच येथील सामाजिक कार्यकर्ते लोकप्रिय श्री किशोर दादा टोंगे यांनी प्रत्यक्ष या पीडित शेतकरी बांधवांची भेट घेऊन त्यांची संतवान करून त्यांना त्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर पीडित शेतकरी समोर वरिष्ठ अधिकारी यांना फोन करून सर्व माहिती दिली व या सर्व परिसरातील सर्व शेतीची पाहणी करून नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली..

          नदी लगत असलेल्या सर्व शेतामध्ये पुराचे पाणी साचले असल्याने येथील सर्व शेती पाण्या खली आली असून ती नष्ट होण्याच्या मार्गात लागली आहे तेव्हा हाती आलेले पीक पूर्णतः नष्ट होत असल्याने सर्व शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू चे पूर वाहात आहे . आधीच येथील शेतकरी हा कर्ज बाजारी होऊन आपली शेती पिकवली परंतु यात हे पुराचे नवे संकट याने शेतकरी अधिकच खचला आहे .

समोरील जीवन जगणे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे . तेव्हा शेतकऱ्यांना आत्महत्या प्रवृत्त न करता त्यांना शासनाकडून काहीतरी त्यांना दिलासा मिळावा त्याच्या केलेल्या कष्टाचा मोबदला मिळावा त्या करिता येथील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी युवा सामाजिक तडफदार कार्यकर्ते श्री किशोर दादा टोंगे यांनी केली असून या शेतकऱ्यांच्या सदैव मी पाठीशी राहिली अशी ग्वाही देत शेतकऱ्यांचे सांत्वन केले.

         पूर परिस्थितीने सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसून हे नुकसान माझे पण झाले आहे कारण मी पण एक शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यांच्या भावना काय असतात हे मला अधिक माहीत आहे त्यामुळे येथे झालेल्या सर्व शेतकऱ्यांची नुकसान मला बघवत नाही हे दृश्य पाहून माझे देखील डोळे पाणावले असून याकरिता मी सदैव शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रयत्नशील राहील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी अक्षय बोंदगुलवार, मधुकर भलमे, मनोज तुरानकर , छगन आडकिने , व अन्य शेतकरी उपस्थित होते.