✒️ चिमूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चिमूर (दि.12 फेब्रुवारी) :-गेल्या काही दिवसापासून विदेशातून कापूस आयात केला जात असून त्यामुळे देशातील महाराष्ट्रातील सह चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे चिमूर तालुक्यातील कापसाला वाढीव दर मिळावा या मागणी, शेतकरी पुत्र विनोद उमरे यानी केली आहे.
कापसाच्या आयातीमुळे भारतातील महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळत नाही परिस्थिती पाहता शेतकरी हा कबाड कष्ट करून छोट्या रोपट्यापासून ते त्या कापसापासून कापूस उत्पादित करण्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करतो ज्यावेळी शेतकऱ्याकडे कापूस नसतो त्यावेळी कापसाला भाव मोठ्या प्रमाणात असतो परंतु ज्यावेळी शेतकऱ्याकडे कापूस येतो त्यावेळी मात्र शेतकऱ्याच्या पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला योग्य भाव मिळत नाही.
ही या देशातील दुर्दैवाची गोष्ट दुर्दैवाची बाब आहे या अनुषंगाने शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी विदेशातून आयात करण्यात येतो तो कापूस बंद करण्यात यावा आपल्या देशातील कापसाला महाराष्ट्रातील जिल्ह्यातील कापसाला योग्य भाव मिळाण्यात यावे शेतकरी पत्रु विनोद उमरे यांनी केली आहे.