🔸चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.30 सप्टेंबर) :-
पावसाअभावी शेतक-यांचे नगदी कपाशी,सोयाबीनचे उत्पन्न कमालीने घटले.शिवाय दर ही समाधान कारक मिळाला नाही.यामुळेच सरकारने या दोन्ही पिकाला प्रती हेक्टर पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली.मात्र, घोषणा करुन देखील मोठा कालावधी झाला तरी अनुदानास शासनाकडून’तारीख पे तारीख’सुरु केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील साधारण अधिक शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.
शेतक-यांना आर्थिक हातभार लावत असलेली गतवर्षी कपाशी,सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर पावसाअभावी मोठा परिणाम झाला. त्यातच सोयाबीनचे ४ हजार २०० तर कापसाचे ६ हजार ८०० ते ७ हजार २०० च्या पुढे दर सरकलेच नाही.मात्र, शेतक-यांच्या घरातील कापुस विक्री होताच भावात थोडी सुधारणा झाली.उत्पन्नाचा खर्च अधिकचा झाला असताना या दोन्ही पिकाचे उत्पन्न खर्चाइतपत पदरात पडले नाही.यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले होते.यामुळे विरोधकांकडुन शेतक-यास अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी विनोद उमरे यांनी केली आहे.
राज्य शासनाकडून मागणी मान्य करुन सोयाबीन व कापुस या दोन्ही पिकाला प्रती हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा करुन सदरील मदत दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली.परंतू निर्णय होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी आद्याप ही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतक-यास कापुस सोयाबीनचे अर्थसहाय्य मिळाले नाही.
दरम्यान,प्रारंभी ऑगस्टच्या २१ तारखेला जमा होईल असे जाहीर केले असता अर्थसहाय्य शेतक-यास देण्यात आले नाही.त्यानंतर ता १० सप्टेंबर अर्थसहाय्य बॅक खात्यावर वर्ग करण्यात येणार अशी घोषणा केली. आता सप्टेंबरच्या २८ तारखेला अर्थसहाय्य वितरीत करण्यात येणार असले तरी आद्याप तरी शासनाकडून अधिकृत निर्णय आलेला नाही.परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील अनुदानास’तारीख पे तारीख’येत असल्याने विनोद उमरे यांनी आरोप केला आहे.