कान्हाळगाव येतील अंगणवाडी क्र 2 मध्ये पोषण अभियान कार्यक्रमा अंतर्गत एक पेढ माँ के नाम कार्यक्रम सम्पन्न 

🔹बाळाचे संगोपण करणे अंगणवाडी सेविके सोबतच प्रत्येक गरोदर मातेची जबाबदारी आहे श्री नारायण हिवरकर माजी सरपंच यांचे प्रतिपादन 

✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)

कोरपना(दि.5 सप्टेंबर) :- तालुक्यातील दुर्गम भागातील कान्हाळगाव येतील अंगणवाडी क्र 2 मध्ये पोषण अभियान पोषण पंधरवडा अंतर्गत एक पेढ माँ के नाम कार्यक्रमाचे अध्येक्ष आयोजण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्येक्ष श्री नारायण हिवरकर माजी सरपंच तथा संजय गांधी निराधार अध्येक्ष होते तर प्रमुख पाहुणे सौ वर्षाताई जेणेकर सौ प्रतिभा ताई दाखरे सौ मंदाताई टेकाम अंगणवाडी सेविका सौ वणीताई दुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते माजी सरपंच श्री नारायण हिवरकर यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

व त्यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक गरोदर मातेनी बाळाचे संगोपण करताना आहार वेळो वेळी काळजी पूर्वक जोपासना करावी अंगणवाडी सेविका आपले कर्तव्य पार पाडत असतात त्या सोबतच प्रत्येक मातेची जबाबदारी असते ती पार पाडवी असे मनोगत व्यत केले कार्यक्रमाला माता बाळ गोपाळ उपस्थित होते कार्यक्रमाच संचालन सौ मंदाताई टेकाम यांनी केले तर आभार येरेकर ताई यांनी मानले.