🔸भजन, किर्तन व मार्गदर्शन : ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
🔹रविंद्र शिंदे यांच्या ट्रस्टच्या माध्यातुन योगदान
✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती(दि.1 सप्टेंबर) :- तालुक्यातील कान्सा ( शि. ) येथे आज दि. ३१ ऑगस्ट रोज शनिवारला ११ वा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या प्रसंगी भजन, किर्तन व मार्गदर्शन आदि उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटन स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक तथा शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे ( वरोरा व राजूरा विधानसभा क्षेत्र ) व सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन ठेंगणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ह.भ.प. विठ्ठल महाराज डाखरे यांनी गोपाल काल्याचे किर्तन सादर केले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक आचार्य ना.गो.थुटे , कार्यक्रमाचे मार्गदर्शक गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूरचे जिल्हा सेवाअधिकारी रूपलाल कावळे, यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.धनराज आस्वले,ट्रस्टच्या कोषाध्यक्ष सुषमाताई शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, भटाळीचे सरपंच सुधाकर रोहनकर, कान्साचे सरपंच मयूर टोंगे, पानवडाळा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गजानन उताणे, पोलीस पाटील दीपक कुंभारे, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक बाळासाहेब पडवे , किसन माटे महाराज, माधव कौरासे, प्रशांत कारेकर, जेष्ठ नागरिक कवडू पा. भोयर, सुर्यभान पा. पिदुरकर, नामदेव पा. टोंगे व बालाजी पा. रोडे आनंदराव आस्वले, हरीभाऊ रोडे, विकास मत्ते, विष्णुदास मत्ते , नंदू वाढई, चंद्रशेखर घुगुल, पुरुषोत्तम चौधरी, विठोबा टोंगे, देवराव पिदुकर, मारोती निखाडे, अनिल मत्ते,ललीत पिदुरकर, सुनिल रोडे, शंकर रोडे, ग्रा.पं. कान्सा सदस्य संजय किन्नाके, संदिप कुटेमाटे, सोनू रोडे, ममता रामटेके, सुभद्रा गेडाम, रुपा कुंभारे, कुसम रोडे, सुभद्रा रोडे, मंदा पिदुरकर, शारदा आसुटकर, मंजुळा झाडे, शिला आगलावे, नंदा बगडे, प्रगती शिंदे, किरण वनकर, नंदा बगडे, जयंती भाले यांच्यासह समस्त कान्सा ( शि. ) ग्रामस्थ फार मोठया संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीभाऊ रोडे, सुत्रसंचलन बाळासाहेब पडवे आणि आभार प्रदर्शन विकास मत्ते यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी…रवींद्र शिंदे :- वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी असून त्यांच्या विचाराने प्रत्येक कुटुंबीयांची आणि पर्यायाने गावाची सर्वांगीण प्रगती करणे शक्य असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक रवींद्र शिंदे यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी रवींद्र शिंदे यांनी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, विदेही सद्गुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेविषयक मार्गदर्शन, श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान, हिंदू हृदयसम्राट वं. बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, अनाथांची माई स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना आणि कै. म.ना. पावडे ह्या विविध योजनांची सविस्तर माहिती देताना. गरजवंतांनी ट्रस्टशी संपर्क साधावा . असे उपस्थितांना आवाहन केले.
मानस प्रसंगातून ओळखल्या जातात…आचार्य ना.गो. थुटे :- मानसाची खरी ओळख ही त्याच्या वक्तृत्वातून किंवा वेशभूषेतून होत नसते. तर माणसं प्रसंगातून ओळखल्या जातात. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य ना.गो. थुटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात केले. वं. राष्ट्रसंताची शिकवण गावातील प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करून गावाची प्रगती साधावी .असे ग्रामस्थांना आवाहन केले. याप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे चंद्रपूर जिल्हा सेवाअधिकारी रूपलाल कावळे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन ठेंगणे आणि प्रा. धनराज आस्वले यांनी सुद्धा उपस्थित त्यांना अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले.