कवितेच्या घराच्या पुरस्कारांसाठी बालसाहित्य पाठविण्याचे महाराष्ट्रातील साहित्यिकांना आवाहन

🔹कवितेच्या घराचे दोन बालसाहित्य पुरस्कार

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी) 

वरोरा(दि .17 जुलै) :- सध्या महाराष्ट्राच्या काव्यप्रांतात अतिशय चर्चेचा विषय झालेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात नवनव्या व वैशिष्ट्यपूर्ण अशा उपक्रमांची भर पडत आहे. 

कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव ( बु ), त. वरोरा जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरात महाराष्ट्रातील बालसाहित्यिकांच्या दर्जेदार बालसाहित्याचा सन्मान होणार आहे. या सन्मानार्थ दोन पुस्तकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय उत्कृष्ट बालकवितासंग्रह पुरस्कार ( प्रथम पुरस्कार,३००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह व बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय उत्कृष्ट बालकवितासंग्रह पुरस्कार (द्वितीय पुरस्कार,२००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह ) या पुरस्कारांचा समावेश आहे. कवी, प्रकाशक यांनी दि. ०१ जानेवारी २०२३ ते १० ऑगस्ट २०२४ या काळात प्रकाशित झालेल्या ( प्रथम आवृत्ती ) आपल्या बालकवितासंग्रहाच्या तीन प्रती प्रा. प्रमोद नारायणे, ( कार्यवाह, कवितेचे घर ) शाहू ले आऊट, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाजवळ, वर्धा ४४२००१* या पत्त्यावर दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवाव्या असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिकांच्या / समीक्षकांच्या मार्फत साहित्याचे परीक्षण करण्यात येईल. ७ सप्टेंबर २०२४ रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असून दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी कवितेचे घर, शेगांव ( बु ), त. वरोरा, जि. चंद्रपूर येथे आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, मुंबई यांच्या हस्ते हे दोनही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी बालसाहित्य पाठवून नामांकन करणाऱ्या सर्व साहित्यिकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

या पुरस्कारांसाठी जास्तीत जास्त साहित्यिकांनी आपले बालसाहित्य पाठवावे असे आवाहन श्रीकांत पेटकर, कल्याण ९७६९२१३९१३ ( संस्थापक, कवितेचे घर ), किशोर पेटकर, नागपूर ८८०६२४७६८६ ( संकल्पनाकार, कवितेचे घर ), प्रा. प्रमोद नारायणे, वर्धा ९८५०३०९६६५ ( कार्यवाह, कवितेचे घर ) डॉ. संदीप भेले, बदलापूर ९८८१४२२४५३ ( कार्यक्रम समन्वयक, कवितेचे घर ), सूर्यकांत पाटील, वरोरा ९४२२१९१५२४ ( प्रसिद्धी प्रमुख, कवितेचे घर ) यांनी केले आहे.