कल्पतरू गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.11 सप्टेंबर) :- सध्या शहरी व ग्रामीण भागात डेंग्यू व मलेरिया साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील कल्पतरू गणेश मंडळाने अवांतर आणि खर्चिक उपक्रम टाळून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कल्पतरू गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५० नागरिकांनी रक्तदान केले.

या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वरोरा शहरातील गांधी चौक येथे कल्पतरू गणेश उत्सव मंडळ, विनोबा भावे हाॅस्पिटल वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे सह रक्तसंकलन चमूचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

त्यानंतर कल्पतरू गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांसमोर मांडली. या रक्तदान शिबिरात ५० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये पुरुष व महिलांनी आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सर्व शहरवासीयांनी कौतुक केले. याप्रसंगी गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रतिष्ठित मंडळी, युवक बहुसंख्येने उपस्थित होते.

सर्व रक्तदात्यांना मंडळाकडून चहा व अल्प उपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सर्व गणेश उत्सव मंडळांनी असेच सामाजिक अभिनव उपक्रम कार्यक्रम राबवावे अशी अपेक्षा मंडळातर्फे व्यक्त करण्यात आली. रकतदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कल्पतरू गणेशोत्सव मंडळ वरोरा च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले.