कर्जबाजारी मुळे शेतकऱ्याची आत्महत्या

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि .6 सप्टेंबर) :- तालुक्यात येत असलेल्या मोरवा या गावात आज युवा शेतकऱ्याने आज विष कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर असे की.सततची नापिकी, डोक्यावर सतत वाढत गेलेला कर्जाचा डोंगर यामुळे नैराश्य येऊन तालुक्यातील मोरवा येथील एका शेतकऱ्याने घरातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मोरवा येथे दिनांक 3 ला सकाळी उघडकीस आली.

प्रभाकर परसाराम आत्राम, वय पन्नास वर्षे, राहणार मोरवा असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्याच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत. शेतकऱ्यांच्या या आत्महत्येमुळे गावात सर्वत्र व्यक्त होत आहे.