कपाशीला यंदा तरी भाव मिळेल का? शेतकरी नेते विनोद उमरे

🔸केंद्रातील व महाराष्ट्रातील मायबाप सरकार शेतकऱ्यावर लक्ष देतील काय?

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.20 ऑक्टोबर) :- कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाही. दरम्यान आता रब्बी हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांना भांडवलासाठी पैशांची गरज आहे.यामुळे ज्या शेतकऱ्यांनी म्हणजेच लवकर कापसाची पेरणी केली होती ते शेतकरी बांधव कापसाची वेचणी करून थेट कापूस विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. काही ठिकाणी खरेदी सुरू आहे.खेडा खरेदीच्या माध्यमातून स्थानिक खाजगी व्यापारी कापसाची खरेदी करत आहेत.

भाव मिळेल यावरच कापसाचे संपूर्ण गणित अवलंबून राहणार आहे.सद्य परिस्थितीत काही बाजारात कापसाची थोड्याफार प्रमाणात काही शेतकऱ्याकडून मागील वर्षाचा भावबाजी मुळे साठवून ठेवलेला कापूस तर काही भागात आता निघालेल्या नवीन कापूस आवक होत आहे.मागील वर्षी सुरुवातीला कापसाला किमान ७३०० कमाल ७३५०आणि सरासरी ७३३० एवढा भाव

मिळाला होता.शेतकऱ्यांची कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव देण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केले आहे.तर चांगला भावा मिळेल अशी इच्छा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

“कापूस अर्थातच कपाशी हे पीक महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा, तसेच इतर राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. कापसाला पांढरे सोने म्हणूनही ओळखले जाते.गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला नाही.यंदा तरी कापसाला चांगला भाव मिळेल का हा सवाल ?शेतकरी नेते विनोद उमरे व शेतक-यांकडून उपस्थित होत आहे”.