एक मेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ हे शरीर आहे नाशवंत पण कार्य रहाते अनंत 

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि 4 जुलै) :- 

दिनांक 30 जून 2024 रोजी अनाथ रस्त्यावरील निराधार यांचा सांभाळ करणारे आसक् निराधार वृद्ध आश्रम देवाची उरुळी सासवड रोड हडपसर पुणे यांच्या माध्यमातून आणि मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्यातून हडपसर पुणे येथील वृध्द रुग्ण आज्जिना मोफत व्हीलचेअर भेट देण्यात आली

या वेळी त्यांच्या परिवाराच्या वतीने दोन्ही संस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले

या प्रसंगी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी पालखी पुण्यात आली पण आसक् वृध्द निराधार आश्रमाचे संचालक अध्यक्ष आदरणीय श्री दादा गायकवाड आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी आदरणीय सौ.कुशाताई दादा गायकवाड यांच्या मानवतेच्या कार्याला विठोबा रुख्मिणी यांचे दर्शन झाले असे म्हणत.

त्यांचे आशीर्वाद घेतले मधु तारा नेहमी स्वतः जाऊन व्हीलचेअर अन्य उप करणे घरी नेऊन पोहचविण्याचे कार्य करते मधु तारा प्रत्येक गरजू पर्यंत पोहचून कार्य करते आणि हे कार्य अशा देवातील माणसांमुळे होते असे कर्मवीर दादा गायकवाड व कुशाताई गायकवाड म्हणाले मधु तारा प्रत्येकांसाठी प्रत्येक जण मधु तारा साठी