एक दिवस आठवणीतला …..! दिलीप हल्याळ सर यांचे दुःखद निधन

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.11 सप्टेंबर) :- अत्यंत दुःखद घटना घडली आहे , माझा आठवणीतील एक दिवस सर यांच्या बरोबर घालवण्यासाठी मिळाला होता , ती आठवण मि कधीच विसरू शकत नाही, कारण अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद च्या नाटय जागर स्पर्धेचा तो दिवस होता , बालगोपाल यांची अंतिम स्पर्धा होती त्यात नाटय वाचन , बालनाटय, बालगीतगायन ,एकपात्री , नाटय संगीत , अश्या झाल्या होत्या , स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टेबल मांडणी सुरू होती , आणि एकपात्री स्पर्धा सुरू एक स्पर्धकांचे एकपात्री करताना त्याचा मेकअप केला होता .

हातापायाला पावडर सांडली होती , कोणी साफसफाई वाले जवळ नव्हते त्यांना बोलवायला आमचा मित्र गेला होता पण स्पर्धा पटापट सुरू करायच्या होत्या , वाट बघणे मला पटले नाही मी माझ्या किश्यातील रुमाल काढला आणि स्टेज वर सांडलेली सपेद पावडर झाडायला लागलो , ती झाडून झाल्यावर मला दिलीप हल्लाळ सर यांनी स्टेजवर उभे राहा सांगून सर्व स्पर्धेक यांना आणि पालकांना सांगितले की नाट्यकर्मी ला कोणतेही काम जमले पाहिजे , तोच खरा नाट्यकर्मी , आणि मी केलेल्या कामासाठी सर्वांना टाळ्या वाजवून माझे अभिनंदन करा असे सांगितले मला खूप तेव्हा गहिवरून आले आणि मी सरांना भेटून नमस्कार केला , त्यावेळी परीक्षक दिलीप हल्याळ सर यांच्या बरोबर। अभिनेते विजय पाटकर सर पण होते त्यांनी ही माझे कौतुक केले, मी दिलीप हल्याळ यांना म्हणालो सर मी एक कार्यकर्ता आहे .

आपण मला हा मान दिल्या बद्दल मी आपला ऋणी राहीन असें सांगून पुढील कामास निघून गेलो…! असे होते आमचे लाडके हळवे हृदय असणारे सर्वाना खळखळून हसवणारे , प्रत्येकाला मानसन्मान देणारे प्रसिद्ध अभिनेते , लेखक , परीक्षक श्री दिलीप हल्याळ सर भावपूर्ण श्रद्धांजली , आणि मानाचा मुजरा.