✒️सारंग महाजन बुलढाणा(Buldhana प्रतिनिधी)
बुलढाणा (दि.9 ऑक्टोबर) मा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमी द्वारा मार्फत बातमी मिळाली होती की रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे हरीष राहुल उजलेकर रा. वरणगाव ता. भुसावळ अग्नि शस्त्र घेऊन कोणतातरी गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील एम .आय.डी.सी परिसरातील सद्गुरु इंजिस्टीट जवळील बांधकाम चालू असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती .
त्यावरून पो. उपनिरी. मंगेश जाधव, पोहे कॉ./2692 विजय बळीराम नेरकर, पोहे कॉ./2816 निलेश बाबुराव चौधरी, पो कॉ./1539 महेश एकनाथ चौधरी, पो.कॉ./2301 राहुल विनायक वानखेडे, पो .कॉ./272 भूषण चौधरी, पो. कॉ.3398 प्रशांत रमेश परदेसी, पो.कॉ.59 जावेद शहा अंशनी आणि नेम .भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन सदर ठिकाणी जाऊन बातमी प्रमाणे सदर इसमावर अचानक 18.05 वाजता छापा टाकून त्यास जागीच पकडले असता त्याच्या अंगझतीत खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळवला आहे.1) 15000 रु. किं. एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझिनसह त्याचं लाल रंगाची प्लास्टिकची ग्रीप असलेला
2) 2000 रु .किं. दोन जिवंत राऊंड (काढतुस) 17000 रु. किं.
सदरची कारवाही मा. पोलीस अधीक्षक माननीय श्री डॉ .महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शना मा .पोलीस निरीक्षक राहुल वाघ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पो.उपनिरी .मंगेश जाधव, पो. हे कॉ. /2692 विजय बळीराम नेरकर, पो .हे कॉ ./2816 निलेश बाबुलाल चौधरी, पो .हे कॉ./1539 महेश एकनाथ चौधरी, पो .कॉ./2301 राहुल विनायक वानखेडे, पो .कॉ./272 भूषण चौधरी, पो .कॉ./3398 प्रशांत रमेश परदेशी, पो.कॉ.59 जावेद शहा अंशानी केली आहे.
कामगिरी केल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या हस्ते प्रशंसापत्र देण्यात आले.