✒️शिरीष उगे वरोरा( Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.11 जुलै) : – येथील उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक लोकसंख्या दिन नुकताच उपजिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रम डॉ. प्रफुल खुजे MS वरोरा यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला. कार्यक्रम दीप प्रजवलन करून सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सी. टी. विरुटकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वंदना बरडे होत्या. गरोदर माता, रुग्ण व रुग्णाचे याप्रसंगी नातेवाईक मोठ्या संख्यानी हजर होते. श्रीमती वंदना बेर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
तसेच डॉ. विरुटकर सर यांनी अध्यक्षीय भाषना मध्ये दोन अपत्य मधील पुरेसे अंतर, त्या बाबत तांबी, छाया इंजि. अंतरा निरोध या बाबत मार्गदर्शन केले. तसेच कुटुंब नियोजन पद्धत पुरुष शत्रक्रिया साधी आणि सोपी असल्याचे सांगितले. प्रसूती नतर महिलांची व पुरुष नसबंदी शत्रक्रिया करिता येणाऱ्या दिवसात नियमित कॅम्प घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे आभार आरोग्य सहाय्यक सतीश येडे यांनी केले.