उत्पादनातही मोठी घट : सोयाबीन भावातही मोठी उत्तरण?शेतकरी राजा झाला मोठा हवालदिल

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .18 ऑक्टोबर) :- जिल्हात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोयाबीन पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.दोन वर्ष पूर्वी सोयाबीनला उच्चांकी मिळाला होता.त्यामुळे अनेक शेतकरी यांनी या वर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती.तर सोयाबीन पिकाला चांगले दर मिळेल अशी आशा होती.पण सोयाबीनच्या दरात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.सोयाबिच्या पिकांचे भाव घसरले मात्र सोयाबीन काढणीला भाव वाढले आहेत.

गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते . यावर्षी तर दसरा दिवाळीला गोड धोंड करण्यासाठी चार पैसे येथिल असे वाटले असतानाच पावसाने दोन महिने वास्तव्य केल्याने पिकांवर यलो मोझॅक रोग पडल्याने सोयाबिन पिक करपून गेले.

त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली असून अशा परिस्थितीत सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती.सोयाबीन पिक उत्पादनात मोठी घट झाल्याने व सोयाबीन पिकाच्या भावात मोठी उत्तरणं झाल्यानें शेतकरी राजा मोठा हवालदिल झाला आहे.