उत्कृष्ट नंदीबैल सजावट स्पर्धा मध्ये श्रीरश उगे प्रथम

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.4 सप्टेंबर) :- व्यापारी मंडळ ताना पोळा उत्सव समिती व 24 तास सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन चौक वरोरा येथे उत्कृष्ट नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री रश उगे या बालकाने पटकाविला .

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर माजी नगराध्यक्ष विलास टिपले माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली भाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर माजी नगरपरिषद सभापती छोटू शेख अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सागर वझे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण काकडे शुभम चिमूरकर दिपाली माटे डॉक्टर काजल धोटे सुनील कटारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी सर्पमित्र बाळू जीवने हिमालय मडावी अनिकेत मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला नंदीबैल सजावट स्पर्धेत द्वितीय क्रमांक रुद्राक्ष क्षीरसागर तृतीय संदेश कुकरेजा चतुर्थ अध्याय शेंडे पाचवं रिदम चौधरी यांनी पटकाविले कार्यक्रमाचे संचालन आरती रोडे व गुरुदेव जुमडे यांनी केले .

तर स्पर्धेचे परीक्षण राजेंद्र मर्दाने हरीश ढोबळे उज्वला खिरटकर रेखा झाडे भारतीय लखमापूरे साबीया खान यांनी केले कार्यक्रमाला लखन केशवानी सखाराम पाऊलकर दत्त श्री ठाकरे पद्माकर झोडा पे शशिकांत ठाकरे सुरज केशवानी प्रफुल वनकर लेकु केशवानी सुरज मेश्राम श्रेयश कुंबरे अक्षय शिरसागर दीपक केशवानी अमित घोडमारे मनोज गुप्ता आदींनी सहकार्य केले.