उत्कर्ष डोळस याची एस आर पी पोलीस दलात निवड

✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.17 ऑगस्ट) :- 

उत्कर्ष सुनील डोळस मुक्काम पोस्ट कोळगाव ता. शिरूर जि. पुणे यांची एस आर पी पोलीस दौंड सात गट क्रमांक यामध्ये निवड झाली. जिद्द चिकाटी या जोरावर उत्कर्ष ने हे यश खेचून आणले अतिशय ग्रामीण भागातला हा मुलगा आई-वडील शेती करणारे याचे लहानपणापासूनचे स्वप्न पोलीस बनायचे हे त्याने आज फळास आणले.

            अभ्यासाचे सातत्य नियोजन यामुळे उत्कर्ष याने पोलीस होण्याचा आणि एस आर पी भरती होण्याचा कोळगाव डोळस गावातून पहिला नंबर मिळवला. संपूर्ण गाव व ग्रामस्थ यामुळे आनंदित झाले आहे. अनेक मान्यवरांनी उत्कर्ष डोळस यांचे कौतुक केले आहे.

तसेच 15 ऑगस्ट निमित्त ग्रामस्थांनी मराठी जिल्हा परिषद शाळेने व ग्रामपंचायत कोळगाव डोळस यांच्यावतीने उत्कर्षाचा हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार सारंग महाजन यांनी सुद्धा उत्कर्ष च्या निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.