🔹रिपाई आठवले गट चंद्रपूर महानगर चे अध्यक्ष संदिप जंगम यांची मागणी
✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.12 जुलै) :- चंद्रपूर येथील इरई व झरपट नदीचे खोलीकरण आणि सौंदरिकरण करण्यात यावी अशी मागणी युवानेते रिपब्लिकन पार्टि ऑफ ईंडिया आठवले गटाचे चंद्रपूर महानगर चे अध्यक्ष संदिप जंगम यांनी नुकतीच केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील दर वर्षी माता महाकाली जञा मोठ्या उत्साहात भरते राज्यातील हजारो चा संख्येत भाविक माता महाकालिचा दर्शनाला येतात. श्रध्देचे स्थान असलेल्या झरपट नदिचा भाविक या अस्वच्छ पाण्यात आंघोळ करतात. या नदित इकोर्निया वनस्पतीत खुप आहेत कमालीची उदासीनता म्हणजे जञेला सुरुवात होणार तेव्हाच संबंधित प्रशासनाला जाग येते नंतर वर्ष भर सुस्त होते.
अशा वर्षातून एक वेळा श्रद्धास्थान असणार्या झरपट नदिचा कधी नाला होणार हे कळनार नाही. इरई नदि थोडीफार स्वच्छ करण्यात आली. मात्र उदासीनतेमुळे ती देखील अस्वच्छ होत आहेत. झरपट नदि वाचविण्यासाठी संबंधित प्रशासनाने व्यापक अभियान राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. झरपट नदि भक्तांचे श्रद्धास्थान, जीवनदायिनी होती.
माञ आता नदिचा नाला झाला असल्याचे दिसत आहे. उलट ती प्रदूषित करणार्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ज्या भागात नदिचा प्रवाहाने स्पर्श करुन पवित्र केले, तेथील पावित्र्य कायम न राखता सांडपाणी नदित सोडतात. याशिवाय शहरातील काहीतरी मलवाहिन्या या झरपट नदित सोडण्यात आले.
संबंधित विभागाने एका तरी कर्मचारीवर्ग लक्ष ठेवून नदिचे पवित्र वाचवावे.
अशी मागणी शहर महानगर अध्यक्ष संदिप जंगम यांनी सबंधित प्रशासनाला विनंतीसह केली आहे.